Posts

Showing posts from May, 2023

कोकणकड्यावरचा सूर्यास्त

Image
तसं बघितलं तर सह्याद्री मध्ये कुठूनही सूर्योदय अथवा सूर्यास्त बघा , तो आपल्याला मंत्रमुग्धच करतो . जर तो राजगडावरून बघत असू तर महाराजांनी तोरणा कसा जिंकला हे उलगडून सांगतो .. राजगडाचा च सूर्योदय पुरंदरावर धरातीर्थी पडलेल्या मुरारबाजींची आठवण करून देतो ....महाराजांच्या आग्रा प्रवासाची सुरवात याचं दिशेने झाली ....मिर्झाराजांच्या छावणीत बादशहा चं फर्मान आणी त्याला समोरे गेलेले महाराज आणी शंभु राजे .... असे अनेक किल्यांवरचे अनेक सूर्योदय आणी सूर्यास्त अनेक आठवणी जाग्या करतात....  ...मोहरीच्या पठारावरून रायगडामागे जाणारा सूर्य तर डोळ्यात पाणी आणतो , कारण याचं रायगडावर आपल्याला तारणाऱ्या सूर्याचा अस्त झाला होता नं ....  पण हरिश्चंद्राच्या कोकणकड्यावरून सूर्यास्त बघणे म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे ...मनात प्रचंड उलथापालथ करून  क्षणात शांत करणारा ...  प्रचंड खळबळ माजवून झटक्यात निसर्गाशी आणी त्या विधात्याशी जोडणारा इथला सूर्यास्त आहे .  सूर्यास्ताची वेळ जसजशी जवळ येते तसतसा कोकणकडा अंग झटकून उभा राहायला सुरवात करतो ....मधेच भन्नाट वाहणारा वारा सुद्धा पूर्णपणे स...

मुल्हेरच्या पायथ्याला.... मोहरीचा (राई ) चहा ...

Image
  घ्या हा मोहरी चा फक्कड चहा  एक किस्सा ....गेल्या वर्षी एक मोहीम आखली गेली , आणि ती म्हणजे महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला " साल्हेर " पादाक्रांत करण्याची....आणि मग सुरु झाली मोहीमवीरांना जमवण्याची खूपच जोखमीची आणि अतिशय क्लिष्ट मोहीम. २५....२०....१७ ....१२....८... असं करता करता जेमतेम मी धरून ५ वीर शड्डू ठोकून तयार झाले. ( मी ,प्रसाद दानवे ,प्रदीप दानवे ,मंदार घोडेकर आणि तेजस घाडगे ). कल्याण वरून रात्री १२ वाजता  सुरु झालेला प्रवास चालक बदलत बदलत सुमारे ३५० किमी नंतर सकाळी ६ वाजता गडाच्या पायथ्याशी संपला ....त्या दिवसभरात किल्ला बघून वगैरे झाला आणि ५ जणांची  टोळी मुक्कामाला मुल्हेर गावात येउन पोचली ,तसं पाहिलं  तर मुक्कामाचा बेत मुल्हेर माची वरचा होता पण साल्हेरनेच पुरती दमछाक केल्याने काही मंडळींनी स्पष्ट नकार दिला ,तर असो ...मुल्हेर मधील एका आश्रमात राहण्याची सोय झाली ...आणि प्रसाद रावांची जेवण बनवण्यासाठी एकच लगबग सुरु झाली, मस्त खानदेशी खिचडी चा बेत झाला आणि पोटावर हात फिरवत आणि अन्नदाता प्रसाद सुखी भव म्हणत टोळके निद्रादेवीच्या अधीन झाले ....सकाळी उठल्या...

सह्याद्रीच्या पोटात .... व्हाया घोणदांड घाट

Image
   बऱ्याच दिवसात अंगातली रग जिरवणारा , ताकदीची चाचणी घेणारा आणि पुन्हा पुन्हा सह्य पर्वतांच्या प्रेमात आकंठ बुडवणारा ट्रेक झाला नव्हता ... मनात कुठेतरी सतत रुखरुख होती .. हरिश्चंद्र सुद्धा पाचनई कडून च केला होता ..लोहगडी सुद्धा घोडा अगदी पायऱ्यां पर्यंत खेचला होता .... चिटूर मिटूर घोडबंदर , धारावी असे किल्ले हि पाहून झाले ...वाढदिवशी रसाळगड केला तोही गाडी गावापर्यंत नेऊन पुढे अर्धा तास चढत ....पण कोकणातून खड्या चढाईने घाटावर नेणाऱ्या , भर दिवसा घट्ट काळोख पसरवणारी जंगलं उराशी बाळगलेल्या , एखादी नथ जशी सौंदर्य वाढवते तसंच सुंदर कलाकुसर असलेल्या लेण्या मिरवणाऱ्या , अनेक औषधी वनस्पती आणि नानाविध  प्राणीपक्षी आपल्या उरात दडवलेल्या आणि मायबाप सह्याद्रीचे अजस्त्र महाकाय कातळकडे आपल्या खांद्यावर तोलून धरलेल्या अशा घाटवाटा सतत साद घालत होत्या . .... दऱ्या घाट , नाणेघाट, सवाष्णी घाट   ,  बैल आणि शिडी घाट , बोचेघोळ , सिंगापूर , बोराटा , गोप्या घाट , मढे घाट , शेवते घाट , वाजंत्री घाट , गणेश घाट या आणि इतर घाटवाटा स्वप्नात येऊन पिंगा घालायला लागल्या होत्या .... तीन विकेंड ...