कोकणकड्यावरचा सूर्यास्त
तसं बघितलं तर सह्याद्री मध्ये कुठूनही सूर्योदय अथवा सूर्यास्त बघा , तो आपल्याला मंत्रमुग्धच करतो . जर तो राजगडावरून बघत असू तर महाराजांनी तोरणा कसा जिंकला हे उलगडून सांगतो .. राजगडाचा च सूर्योदय पुरंदरावर धरातीर्थी पडलेल्या मुरारबाजींची आठवण करून देतो ....महाराजांच्या आग्रा प्रवासाची सुरवात याचं दिशेने झाली ....मिर्झाराजांच्या छावणीत बादशहा चं फर्मान आणी त्याला समोरे गेलेले महाराज आणी शंभु राजे .... असे अनेक किल्यांवरचे अनेक सूर्योदय आणी सूर्यास्त अनेक आठवणी जाग्या करतात.... ...मोहरीच्या पठारावरून रायगडामागे जाणारा सूर्य तर डोळ्यात पाणी आणतो , कारण याचं रायगडावर आपल्याला तारणाऱ्या सूर्याचा अस्त झाला होता नं .... पण हरिश्चंद्राच्या कोकणकड्यावरून सूर्यास्त बघणे म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे ...मनात प्रचंड उलथापालथ करून क्षणात शांत करणारा ... प्रचंड खळबळ माजवून झटक्यात निसर्गाशी आणी त्या विधात्याशी जोडणारा इथला सूर्यास्त आहे . सूर्यास्ताची वेळ जसजशी जवळ येते तसतसा कोकणकडा अंग झटकून उभा राहायला सुरवात करतो ....मधेच भन्नाट वाहणारा वारा सुद्धा पूर्णपणे स...